सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

अक्तूबर, 2020 की पोस्ट दिखाई जा रही हैं

जळकाटाताल तलाव तुडूब ; बळीराजाचे रबीवर लक्ष !

  जळकोट : सततच्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील १२ साठवण तलाव भरुन ओसंडू लागले आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता रबी हंगामाकडे लागले आहे . दरम्यान , यंदा सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे . तालुक्यात यंदा मुसळधार पावसामुळे हळद वाढवणा , ढोरसांगवी , सोनवळा , करंजी , गुत्ती क्र . १ , गुत्ती क्र .२ , माळहिप्परगा , डोंगरकोनाळी , शेलदरा , जंगमवाडी , केकतसिंदगी , रावणकोळा , चेरा , यांजरवाडा , डोंगरगाव हे मोठे तलाव पूर्णपणे भरले आहेत . तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे . तसेच नदी , नाले तुडूंब भरले आहे . परिणामी , तलाव , प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे . गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच यंदा तलाव तुडूंब भरले आहेत . अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीपाच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे . आता शेतकन्यांची रबीवर मदार आहे .