पुन्हा लॉकडाऊन... नगरपालिका क्षेत्रात नियम शिथील तर महानगरपालिका क्षेत्रात जैसे थे. मा. जिल्हाधिकारी लातूर यांनी १ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट पर्यंत नव्याने आदेश काढला असुन, त्या दरम्यान चे काळात काय चालू व बंद असेल याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे.. लातूर शहर व लगतच्या काही गावांच्या ( गंगापूर पेठ, चांडेश्वर ,खोपेगाव ,कव्हा, कातपूर ,बाभळगाव, सिकंदरपुर ,बसवंतपूर, खाडगाव, पाखरसांगवी, कोळपा ,हरंगुळ बु, बोरवटी, मळवटी, वरवंटी, आर्वी, वासनगाव, हनुमंतवाडी, महाराणा प्रताप नगर) हद्दीत दिनांक 01/08/2020 ते 15/08/2020 या कालावधीत खालील बाबी लागू राहतील व दिनांक 15/08/2020 नंतरच्या कालावधीकरिता चे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील . खालील सेवा बंद राहतील . भाजीपाला व फळाची ठोक व किरकोळ विक्री बंद राहील. ऑनलाइन पदार्थ मागवणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा बंद राहील. उपहारगृह, बार ,लॉज ,हॉटेल, रिसॉर्ट, मॉल बंद राहील. केश कर्तनालय ,सलुन, ब्युटी पार्लर दुकाने बंद राहतील. मटन चिकन अंडी मासे आदींची विक्री संपूर्णतः बंद राहील. शाळा, महाविद्यालय ,शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था ,शिकवणी वर्ग
Love Latur Jeev Latur...