सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

जळकाटाताल तलाव तुडूब ; बळीराजाचे रबीवर लक्ष !

  जळकोट : सततच्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील १२ साठवण तलाव भरुन ओसंडू लागले आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता रबी हंगामाकडे लागले आहे . दरम्यान , यंदा सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे . तालुक्यात यंदा मुसळधार पावसामुळे हळद वाढवणा , ढोरसांगवी , सोनवळा , करंजी , गुत्ती क्र . १ , गुत्ती क्र .२ , माळहिप्परगा , डोंगरकोनाळी , शेलदरा , जंगमवाडी , केकतसिंदगी , रावणकोळा , चेरा , यांजरवाडा , डोंगरगाव हे मोठे तलाव पूर्णपणे भरले आहेत . तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे . तसेच नदी , नाले तुडूंब भरले आहे . परिणामी , तलाव , प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे . गेल्या सहा वर्षात पहिल्यांदाच यंदा तलाव तुडूंब भरले आहेत . अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीपाच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे . आता शेतकन्यांची रबीवर मदार आहे .

पुन्हा लॉकडाऊन... नगरपालिका क्षेत्रात नियम शिथील तर महानगरपालिका क्षेत्रात जैसे थे.

  पुन्हा लॉकडाऊन... नगरपालिका क्षेत्रात नियम शिथील तर महानगरपालिका क्षेत्रात जैसे थे.     मा. जिल्हाधिकारी लातूर यांनी १ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट पर्यंत नव्याने आदेश काढला असुन, त्या दरम्यान चे काळात काय चालू व बंद असेल याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे.. लातूर शहर व लगतच्या काही गावांच्या ( गंगापूर पेठ, चांडेश्वर ,खोपेगाव ,कव्हा, कातपूर ,बाभळगाव, सिकंदरपुर ,बसवंतपूर, खाडगाव, पाखरसांगवी, कोळपा ,हरंगुळ बु, बोरवटी, मळवटी, वरवंटी, आर्वी, वासनगाव, हनुमंतवाडी, महाराणा प्रताप नगर)  हद्दीत दिनांक 01/08/2020 ते 15/08/2020 या कालावधीत खालील बाबी लागू राहतील व दिनांक 15/08/2020 नंतरच्या कालावधीकरिता चे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील .    खालील सेवा बंद राहतील .  भाजीपाला व फळाची ठोक व किरकोळ विक्री बंद राहील.  ऑनलाइन पदार्थ मागवणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा बंद राहील.  उपहारगृह, बार ,लॉज ,हॉटेल, रिसॉर्ट, मॉल बंद राहील.  केश कर्तनालय ,सलुन, ब्युटी पार्लर दुकाने बंद राहतील.  मटन चिकन अंडी मासे आदींची विक्री संपूर्णतः बंद राहील.  शाळा, महाविद्यालय ,शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था ,शिकवणी वर्ग

लातूर जिल्ह्यात कोरोनाची झपाट्याने वाढ, एकाच दिवसात तब्बल ३९ पॉजिटिव रुग्ण!

लातूर शहर १६, साईं १, निलंगा १७, औसा २, शिरूर अनन्तपाळ १, आणि अहमदपुर २            लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असूनही शहरात रस्त्यावरील गर्दी कमी होत नाही आहे. आज पासून प्रशासनाने काही सकारात्मक नियम लागु केलेले असताना देखिल काही लातुरकर दुचाकीवर डबल सीट जाताना दिसत होते. दिवसेंदिवस लातूर मध्ये कोरोनाचा आलेख चढत्या क्रमाने बघायला मिळत आहे, आज दिनांक ६ जुलैै रोजी  लातूर शहर १६, साईं १, निलंगा १७, औसा २, शिरूर अनन्तपाळ १, आणि अहमदपुर २ कोरोना पॉजिटिव रुग्ण आलेत.

लातूर 17, अहमदपूर 01, औसा 01 एकूण 19 तर लातूरचे पेंडिंग 06 पॉझेटिव्ह

लातूर 17, अहमदपूर 01, औसा 01 एकूण 19 तर लातूरचे पेंडिंग 06 पॉझेटिव्ह  विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 59 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 36 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 14 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 09 व्यक्तिचे अहवाल  Inconclusive आले आहेत . दिनांक 04.07.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील  25 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 07 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 12 व्यक्तिचे   अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 78 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत व आज 03 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज एका 65 वर्ष वय असलेल्या रुग्णास दमा व निमोनिया हे आजार होते त्यांचा उपचारादरम्यान दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला आहे  अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.

लातूर 12, उदगीर 04 रुग्ण पॉझेटिव्ह

लातूर 236 पैकी 192 निगेटिव्ह 16 पॉझिटिव्ह 11 Inconclusive 25 प्रलंबित व 02 रद्द १२ पॉझिटिव्ह (१० एलआयसी कॉलनी, १ खंडोबा गल्ली, १ बालाजी नगर), उदगीर positive पॉझिटिव्ह (१ नेत्रागाव, १ मोमीनपुरा, २ देगलूर रोड) विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 73 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 52 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे व एका व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे. उर्वरीत 17 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असून 02 व्यक्तिचे स्वब परिपूर्ण न आल्यामुळे त्यांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे. दिनांक 03.07.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील 08 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 04 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 56 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत व आज 05 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे अशी माहिती

लातूर 10, उदगीर 03, अहमदपूर 02 एकूण 15 रुग्ण पॉझेटिव्ह

लातूर : काळे गल्ली 04, सम्राट चौक 01, लोखंड गल्ली 01, lic कॉलनी 01, साळे गल्ली 01 जिल्ह्यात आज पर्यंतचे एकूण रुग्ण संख्या 402, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 175, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 213 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 19. आज 7 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.           विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 50 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 40 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 05 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 05 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे सहायक प्राध्यापक डॉ. बालाजी पुरी यांनी दिली.           विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकून 65 रुग्ण दाखल असून सद्यस्थितीत कोरोना अतिदक्षता विभागात 27 रुग्ण दाखल असून 07 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत व उर्वरीत 38 रुग्ण कोरोना विलगीकारण कक्षात दाखल असून त्यांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे.  आज तीन रुग्णांना त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी 02 रुग

लातूर शहर व जिल्ह्यात जनता कर्फ्यू नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नका- जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर शहर व जिल्ह्यात सर्व दुकाने व आस्थापना पूर्वी प्रमाने सुरु राहतील, जिल्ह्यात ३ तारखेपासून जनता कर्फ्यू नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नका-  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत                  लातूर शहरात पुन्हा २ तारखेपासून जनता कर्फ्यू लागु करण्यात येणार आहे व सर्व प्रकारच्या आस्थापना आणि दुकाने यांच्या साठी नविन नियमावली येणार आहे, या प्रकारच्या चर्चा आणि अफवांना अखेर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या कडून पूर्णविराम मीळाला. प्रशासनाने जाहिर केल्या प्रमाने लॉकडाउन ३१ जुलै पर्यंत वाढवन्यात आला आहे. परंतु सर्व दुकाने व अस्थापना पूर्वी प्रमाणेच ९ ते ५ याच वेळेवर सुरु राहतील. जनतेने ज्या प्रकारे या पूर्वी सहकार्य केले त्याच प्रकारे यापुढे ही सहकार्य करावे व सोशल मीडिया व इतर कोनाकडूनही पसरविन्यात आलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नए असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी श्री जी श्रीकांत यांनी केली.